Breaking News

कोयना नदीत बुडून एकाचा मृत्यू


सातारा : कोयनानगरजवळ गोजेगावच्या हद्दीत कोयना नदीत बुडून सुनील किसन कदम या 35 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. याबाबतची खबर वांझोळे गावचे पोलीस पाटील सुभाष लक्ष्मण पाटील यांनी कोयनानगर पोलीस दूरक्षेत्रात दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोयनानगर भागातील ऐनाचीवाडी येथील सुनील किसन कदम (वय 35) हा दि. 8 पासून बेपत्ता होता. नातेवाइकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. दि. 11 रोजी गोजेगाव हद्दीत कोयना नदीच्या पाणवठ्यावर एक मृतदेह तरंगत असल्याची खबर वांझोळेचे पोलीस पाटील सुभाष पाटील यांनी कोयना पोलीस दूरक्षेत्रात दिली.