अखेर मिलिंद एकबोटेला अटक तब्बल 72 दिवसांनी पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई
पुणे : कोरेगाव भिमा हिंसा प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेंना अखेर पुणे पोलिसांनी बुधवारी बेड्या ठोकल्या. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेचा अर्ज फेटाळल्यामुळे त्यांचे सर्व मार्ग बंद झाले होते. अखेर हिंसा घडल्याच्या 72 दिवसांनी अटक झाली. मिलिंद एकबोटेंवर कोरेगाव भिमा येथे हिंसा भडकवल्याचा प्रमुख आरोप आहे. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी आणि समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने 14 मार्चपर्यंत एकबोटे यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याआधी मुंबई उच्च न्यायालय व पुणे सत्र न्यायालयाने एकबोटे यांना जामीन देण्यास नकार दिला होता. नंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 20 मार्च रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान एकबोटेंना 14 मार्चपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्यामुळे आज त्यावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने त्यांना जामीन देता येणार नाही असे स्पष्ट बजावले.
दरम्यान, पुणे पोलिसांनी मंगळवारीच सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर केला. यात मिलिंद एकबोटे यांनी कोरेगाव भिमा प्रकरणात काही लोकांना कसे भडक वले याचे पुरावे सादर करण्यात आले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन नाकारला.20 फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान एकबोटेंच्या वकि लाने सरकारला तोंडावर पाडले होते. मिलिंद एकबोटेंना अद्याप अटक का केली नाही असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला केला होता. यावर एकबोटे सापडले नाहीत, ते गायब झाले होते असे उत्तर राज्य सराकरच्या वकिलाने दिले होते. यावर एकबोटेंच्या वकिलाने सरकारचे दावे फेटाळून लावत, आम्ही सातत्याने सहकार्य करायला व पोलिसांत जायला तयार होतो, मात्र पोलीस अथवा प्रशासनाने आम्हाला बोलवले नाही असे सांगतिल्याने सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या अब्रूचे खोबरे झाले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या प्रकरणी पुन्हा तपास करा व गरज भासली तर एकबोटेंना अटक करा असे निर्देशच दिले होते. त्यानुसार पुणे पोलिसांनी एकबोटेंचा कोरेगाव भिमा प्रकरणी पूर्ण सहभाग असल्याचे पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर केले. आता एकबोटेंना अटक झाली आहे.
एकबोटे यांनी दिलेल्या चिथावणीनंतर कोरेगाव-भीमा येथे दंगल उसळली, असा त्यांच्यावर पुणे पोलिसांनी आरोप ठेवला आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्र तिबंधक कायद्याखाली (अॅट्रॉसिटी) त्यांच्यावर गुन्हा दाखल असून चिथावणी देणे, दगडफेकीस प्रवृत्त करणे, लोकांना चिथावणी दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अटक होण्याच्या भीतीने एकबोटे यांनी पुणे सेशन कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र एकबोटे यांच्यावर दाखल असलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून त्यांना अटकपूर्व जामीन देता येणार नाही, असेही कोर्टाने नमूद केले होते. यानंतर उच्च न्यायालयाने आता सर्वोच्च न्यायालयाने एकबोटेला जामीन नाकारल्यानंतर पुणे पोलिसांनी अटक केली.