Breaking News

सदगुरूची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी भक्ती करावी - महंत मुक्तानंदगिरी महाराज


नेवासा फाटा येथील श्रीराम साधना आश्रमात चालू असलेल्या किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता प्रभु
श्रीरामजन्मानिमित्त काल्याच्या किर्तनाने झाली .या जन्मसोहळ्यासाठी सुनिलगिरी महाराज, गोपालनंदागिरी महाराज, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोंखडे , आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनी दर्शन घेतले.

यावेळी मुक्तानंदगिरी महाराज पुढे बोलताना म्हणाले कि साधु संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय आनंद सुख, प्राप्त होत नाही, साधु संताची भेट झाली तर आपल्या पुर्वजांचे काहीतरी चांगले कर्म केलेले असते. संत स्वतःसाठी काही करत नाही ,जगाला सुखी ठेवण्यासाठी संत महंत रात्र दिवस प्रयत्न करतात जगातील सर्वात चांगले नाते जर कोणते असेल तर ते म्हणजे पती आणि पत्नीचे आहे भंगवताच्या सेवा करताना त्यामध्ये सोंग ढोंग चालत नाही, भंगवताची भक्ती स्त्रिया तनमन धनाने करतात. भगवान परमार्थ ही अशी गोष्ट आहे की ती डोळ्याने दिसु शकत नाही, आपला मोह हा दुखाचे कारण आहे ,आपल्याला समाधान, सुख, आंनद हे विवेकाने प्राप्त होते, अवगुण जर आपल्यात कसेल तर समाधान प्राप्त होत नाही .संत मंहत यांच्या सानिध्यात गेल्याशिवाय आंनद सुख प्राप्त होत नाही असे यावेळी मुक्तानंदगिरी महाराज यांनी सांगितले.

भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्मोसोहळा उत्साहत पार पडला सकाळ पासून च भविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी केली होती .रामजन्मसोहळ्यासाठी नेवासा तालुक्यातील परिसरातील गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते काल्याच्या किर्तनंतर सर्व भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.शेवटी दहीहंडी फोडुन महंत सुनिलगिरी महाराज व मुक्तानंदगिरी महाराज यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढुन रामजन्मोत्सव साजरा झाला.