बेळपिंपळगावत प्रभू रामचंद्र जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथील श्री राम मंदिरात प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात करण्यात आला. यावेळी गावातील पुरोहित प्रकाश जोशी यांनी मंदिरात विधिवत पूजाअर्चना केली व श्री राम ग्रंथ वाचन केले.
सकाळपासूनच मंदिराच्या सभामंडप मध्ये गावातील भजनी मंडळ , नागरिक, महिला यांनी सुंदर असे भजन सादर केले. महिलांनी यावेळी प्रभू रामचंद्र यांचा पाळणा गायन केले. सकाळ पासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुभाष सरोदे, गणेश बोखरे, उत्तम अंधारे,अशो , काशिनाथ साठे,अशोक तरस, मोहन शिंदे, किसन साठे,गंगाधर वैद्य,सोपान पटारे,सूर्यभान मेहेत्रे, अशोक शिंदे,सोपान मेहेत्रे, अशोक गुलदगड, लक्ष्मन शिंदे, सर्जेराव शिंदे,प्रशांत साळुंके,गौरव गटकळ, विशाल शिंदे, प्रदीप शिंदे, उमेश कांगुणे, लक्ष्मीकांत शिंदे, कैलास गोर्डे, गौरव बोखारे, अभिजीत शिंदे, सार्थक धनवटे, समर्थ धनवटे, संदीप चौगुले, शिवाजी गटकळ, विजय शिंदे यासह गावातील महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. राम नामाच्या गजराने गावातील वातावरण भक्तीमय झाले होते.