Breaking News

जलयुक्त कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार; वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी : राजेंद्र फाळके


मोठा गाजावाजा करत जलसंधारणमंत्री ना. राम शिंदे यांनी जलयुक्त शिवारची कामे केली असल्याची बढाई मारली जात असली तरी या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असुन या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
 
कर्जत तालुक्याचे लोकप्रतिनिधी सध्या जनतेची दिशाभूल करत घोषणांची आतशाबाजी करत आहेत. त्यांनी केलेल्या अनेक घोषणांचा ना. शिंदेंना जरी विसर पडला असला तरी लोक विसरलेले नाहीत. याबरोबर सध्या जी कामे होत आहेत, त्यातही मोठा भष्टाचार होत आहे. आघाडी सरकारच्या काळात कर्जत ते मांगी पर्यत नदीवर अनेक बंधारे बांधले आहेत. याच बंधार्‍यातील पावसाच्या तोंडावर गाळ काढला आहे. त्यानंतर पाऊस झाला त्यात पाणी साचले एवढेच काम जलसंधारण मंञी ना. राम शिंदे यांनी केले. पावसाअगोदर नद्या ओढ्याचा गाळ काढून खोलीकरण केल्याचे दाखवून कोट्यावधी रुपयांची कामे केली जातात. प्रत्यक्षात कागदावर जेवढे काम दाखवले जाते तेवढे केलेच जात नाही. पावसाळ्याच्या तोंडावर काम केले की, पाऊस होतो पाण्याबरोबर गाळ वाहून येतो व जलयुक्तचा खड्डा भरून जातो अशाप्रकारे तालुक्यातच नव्हे तर, जिल्ह्यात मोठा भ्रष्टाचार जलयुक्त शिवार योजनेत झाला असुन, त्याची वरीष्ठ पातळीवरून निपःक्ष चौकशी व्हावी अशी मागणी फाळके यांनी केली आहे. जलयुक्त शिवारच्या कामात दूध का दूध और पाणी का पाणी झाले तर बीड जिल्ह्याप्रमाणे तालुक्यासह जिल्ह्यातही अनेकांना जेलमध्ये जावे लागेल असा इशाराही फाळके यांनी दिला आहे. 

6 वर्षांपासून काम बंद.
कर्जत येथील क्रीडा संकुलाचे काम बंद पडले आहे. त्याची सर्व जबाबदारी आमदार आणि आता नामदार म्हणून राम शिंदे याचीच आहे.
कर्जत येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्था संपन्न झाल्या या कार्यक्रमात खेळाडूसाठी मुख्यमंञी 10 कोटींची घोषणा करतात. तसेच मंञी व जिल्हयाचे पालकमंञी, क्रीडा समितीचे अध्यक्ष राम शिंदे यांना क्रीडासंकुलाचे काम 6 वर्षात पुर्ण करता आलेले नाही ही तालुक्याच्या दृष्टीने मोठी शोकांतीकाच आहे.


समितीचे अध्यक्ष राम शिंदे
आघाडी सरकारने विशेष करून अजित पवार यांनी विशेष लक्ष घालून कर्जत व जामखेड तालुक्यासाठी क्रीडा संकुलाची इमारत उभारण्यासाठी प्रत्येकी 1 कोटी रूपायांचा निधी दिला. कर्जतच्या क्रीडा संकुलाचे काम 2012 साली सुरू झाले. एकाच वर्षात काम बंद पडले. क्रीडा संकुलासाठी जी समिती शासनाने नेमली, तिचे आमदार हे अध्यक्ष असतात. पर्याने कर्जतचे आमदार हे राम शिंदे असल्याने तेच अध्यक्ष व तेच मंञी व नगरचे पालकमंञी असतानाही 6 वर्षात कोटीही खर्च करता आलेले नाहीत. काम अपुर्ण अवस्थेत उभे आहे. यावरून त्यांची काम करण्याची क्षमता व तालुक्यातील प्रश्‍न सोडवण्याची धमक व कुवत ही जनतेच्या लक्षात येते.


पाच कोटीची जागा दिली.
राजेंद्र फाळके हे अध्यक्ष असलेल्या सद्गुरू प्रतिष्ठानने या क्रीडासंकुलासाठी पाच कोटींची पाच एकर जागा देवून 1 कोटींचा निधीही मिळवून दिला. परंतू ना. शिंदेंना 6 वर्षात बाधकामही करता आले नाही.
जागा परत घेणार
क्रीडा संकुलाचे अर्थवट काम दोन महिन्यांत पुर्ण न झाल्यास, दिलेली पाच एकर जागा राज्य सरकारकडून परत घेवू असेही फाळके म्हणाले.
या क्रीडा संकुलाचे काम का अपुर्ण राहीले? यास कोण जबाबदार आहे? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही करणार असल्याचे फाळके यांनी सांगितले.