Breaking News

क्रीडा प्रशिक्षणातून शिक्षकांनी परिपूर्ण बनावे -जिल्हा क्रीडाधिकारी


अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाने 2012 चे क्रीडा धोरण स्विकारले असून, या अंतर्गत प्रत्येक वर्षी शासन क्रीडा शिक्षकांना जिल्हा व राज्य स्तरावर क्रीडा प्रशिक्षण देत आहे. हे प्रशिक्षण दर्जेदार व तंत्रशुद्ध असल्याने मास्टर्स ट्रेनर्स मार्फत दिलेल्या प्रशिक्षणातून शिक्षकांनी नवीन ज्ञान मिळवून काळानुरूप स्वतःत बदल करून परिपूर्ण बनण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी उदय जोशी यांनी केले.

सोनई येथे क्रीडा शिक्षक प्रशिक्षण शिबीराच्या समारोप प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी जोशी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्‍वर खुरांगे, पाटील तुवर, सुनील गागरे, बळीराम सातपुते, घनशाम सानप आदी उपस्थित होते.

निवासी क्रीडा शिक्षक प्रशिक्षणात राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर्स मार्फत विविध खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणा दरम्यान रमेश दळे (अ‍ॅथलेटिक्स- फुटबॉल), सुनील गागरे( खो-खो, बॅडमिंटन), बळीराम सातपुते व अजित कदम (कबड्डी), सोपान लांडे (खो-खो), संभाजी निकाळजे (कुस्ती), जतीन सोलंकी (योगा), इ. प्रशिक्षकांनी प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान पुणे येथील व्हॉलीबॉलचे आंतरराष्ट्रीय कोच देविदास जाधव, आळंदी येथील कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड, फिजिओथेअरपीस्ट डॉ प्रदिप चोभे, स्पोटर्स सायकॉलॉजीस्ट डॉ.प्रसाद उबाळे, आहार तज्ञ अभिषेक भगत, ज्ञानेश्‍वर खुरांगे, अफसर शेख, साध्वी उषादीदी, सिताराम रौंदळ आदी तज्ञांची व्याख्याने झाली.