Breaking News

शहिद जवान मारूती जावळे यांच्या स्मारकाचे लोकार्पण

पाथर्डी (प्रतिनिधी)- पाथर्डी तालुक्यातील कोल्हार कोल्हुबाई येथील शहिद वीर जवान मारूती जावळे यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशन व कोल्हार ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून हे स्मारकाचे काम पुर्ण झाले.

अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या हस्ते स्मारकाचा लोकार्पण झाला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव निवृत्ती भाबड, विश्‍वस्त संभाजी वांढेकर, संतोष मगर, आबासाहेब पवार, अनिकेत पालवे, अनिल पालवे, भाऊसाहेब पालवे, बाबाजी पालवे, अहमदनगर माजी सैनिक संघटनाचे बाळासाहेब नरसाळे, पारनेर माजी सैनिक संघटनेचे शहदेव घनवट, जहिर शेख, आंबादास इंगळे, एकनाथ पालवे, भानुदास गिते, शंकर पालवे, नामदेव पालवे, कोल्हार गावच्या सरपंच शोभाताई पालवे, माजी जि.प. सदस्य मोहनराव पालवे, जनताराम पालवे, उपसरपंच अशोक पालवे, प्रा प्रेमकुमार पालवे, पोलिस अधिकारी शंकर डमाळे, दिपक पालवे, संजय पालवे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पालवे म्हणाले की, सैनिक देशाचा अभिमान आहे. सैनिकांच्या कर्तव्य दक्षतेने आपण रोज आनंदी जीवन जगत आहोत. या स्मारकामुळे भावी पिढीला जवानांनी दिलेल्या बलिदानाने देश सेवेची प्रेरणा मिळणार आहे. सेवानिवृत्ती झाल्यानंतर जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनने उभे केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.