Breaking News

महावीर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

पाथर्डी प्रतिनिधी - शहरातील श्री महावीर युवा मंच, बहू कन्या मंडळ, वर्धमान स्थानकवाशी जैन श्रावक संघ यांच्यासंयुक्त विद्यमाने श्री भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त शहरातून सकाळी भगवान महावीर स्वामी प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये राजस्थानी नृत्य, ढोल पथक, बँडपथक आदी सहभागी झाले. येथील नवीपेठ, जुने बसस्टँड ते जैन स्थानकापर्यंत ही मिरवणूक काढण्यात आली. 

यावेळी पारस महाराज मुथा यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. अशोकलाल भंडारी यांच्या परिवारातर्फे महाप्रसादचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी आ. मोनिका राजळे, नगरसेविका मंगला कोकाटे, नगरसेवक प्रसाद आव्हाड आदी उपस्थित होते. कोरडगावचौकात किशोर परदेशी, प्रतिक खेडकर, प्रशांत शेळके, भाऊ तुपे यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. भगवान महावीरजयंतीनिमित्त शहर व तालुक्यातील जैनबांधवांनी एकत्र येत प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली. या मिरवणुकीत मुलाचे ढोल पथक व विविध गाण्यांवर राजस्थानी नृत्य महिलांनी सादर केले. श्रावणाचे पथक मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रमेश हंडाळ, श्रावक संघाचे अध्यक्ष सुरेश चोरडिया, श्री तिलोक ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, पत्रकार राजेंद्र भंडारी, अजय भंडारी, गौतम भंडारी, भैय्या थोरात, अक्षय गांधी आदी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर माहेश्वरी युवक मंडळातर्फे सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. हिंदू रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. महावीर युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी उत्सवाचे आयोजन केले. सायंकाळी निलेश सुराणा यांचे ‘हॅप्पी फॅमिली’ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाला भाविकाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील मिरी, करंजी, तिसगाव, चिचोंडी, माणिकदौंडी, खरवंडी कासार, टाकळी मानूर येथील मंडळासह वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, महावीर युवा मंच, बहु मंडळ, कन्या मंडळाचे सर्व सदस्य सहभागी झाले. आनंद पाठशाळेच्या बालकलाकारांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. संतोष पटवा, सोनू गुगळे, अभय गांधी, संजय शेट्टी, मुकुंद सुराणा, अनिल खाटेर, सचिन भंडारी, सुनील गांधी आदींनी पुढाकार घेतला.