प्रभु रामचंद्राच्या जयघोषात श्रीराम जन्मोत्सव साजरा
नेवासा येथील पुरातन महिमा असलेल्या जुन्या पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्राचा जन्मोत्सव पुष्पवृष्टी करून साजरा करण्यात आला.यावेळी सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
श्रीराम नवमी निमित्ताने नेवासा येथील जुन्या पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये आयोजित श्रीरामनवमी उत्सवाला गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला रोज रात्री 8 ते 10 यावेळेत श्री क्षेत्र जांब समर्थ येथील कथाकार
ह.भ.प.बाळासाहेब नाईक महाराज यांचे नारदीय कीर्तन झाले.या कीर्तनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.तसेच कृष्णा संगीत विद्यालयाच्या वतीने भक्ती संगीत कार्यक्रम,शास्त्रीय गायन,कृष्णा डहाळे यांनी अभंगवाणी कार्यक्रम सादर केला. सौ.माधुरी कुलकर्णी यांचाचैतन्य स्वरांचेहा भक्तीसंगीताचा कार्यक्रम झाला राजेंद्र परदेशी व जय हनुमान भजनी मंडळ मारुतीनगर यांच्या वतीने हीएकतारी भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला