Breaking News

पवननगरमध्ये श्रीराम जन्मोत्सव उत्साहात


पवननगर येथील श्रीराम मंदिरासमोरील प्रांगणात उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात श्रीरामनवमी निमित्त श्रीराम सेवा समितीच्या वतीने आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये प्रभू श्रीरामाची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीची विधीवत पूजा करण्यात आली.

 विविध भजनी मंडळाच्या महिलांनी भजन, टिपरी नृत्य, श्रीरामाचा पाळणा, अभंग व औक्षण केले. यजमान अनिल दूतारे त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सकाळी 6 वा. श्रींचा महाभिषेक व दुपारी 1 वा. प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. सकाळी 10 वाजता गोरक्ष दूतारे व सहकार्‍यांनी ’भक्तीरंग’ हा श्रीराम जन्मोत्सवाचा कार्यक्रम सादर केला. देह देवाचे मंदिर, बोले पिंजरे का तोता राम, आरंभी वंदीन, ऐसी लागी लगन, शाम तेरी बन्सी, रंग रंग पांडुरंग विठ्ठला, बोलो राम जय सियाराम, राम जन्माला ग सखे राम जन्माला, रामजीकी निकाली सवारी अशी भजने व भक्तिगीते सादर केली. त्यांना हार्मोनियम वर कल्याण मुरकुटे, तबल्यावर ज्ञानेश्‍वर दरेकर, बँजो वर कुलदीप चव्हाण, ऑक्टोपॅड वर रमेश कराळे तर बासरीवर जितेंद्र रोकडे यांनी संगीत साथ केली. यावेळी योगेश ठुबे, डॉ. शिंदे, मूलचंदजी महाराज, जगदंबा डेकोरेटर्स चे दीपक झाडे, एस.एस.वाय. चे गायके गुरुजी, नगरसेवक संपत बारस्कर, शारदा ढवण, दिगंबर ढवण, गणेश धनगर यांचा सत्कार करण्यात आला.