हजरत सय्यद शहा कादरी बाबाचा उरुस उत्साहात
श्रीरामपूर शहराचे अराध्य दैवत असलेल्या हजरत सय्यद शहा कादरी बाबा यांच्या 88 वा उरुस मोठ्या उत्साहात संपन्न झाला . यानिमित्ताने संदलची मिरवणूक पार पडली. तसेच जुबेर सुलतानी कव्वाल यांच्या कव्वालीचा कार्यक्रम झाला.
शनिवारी कदीर सर्फराज चिस्ती (दिल्ली) व नुरी सबा यांच्या कव्वालीचा मुकाबला पार पडला. या दोन्ही दिवस माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, राष्ट्रवादी कॉग्रेस प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जलीलभाई पठाण, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, हेमंत ओगले, मुजफ्फर शेख, मुख्तार शाह, रंजना पाटील, संजय छल्लारे, अशोक उपाध्ये, अतुल झिरंगे, नागेश सावंत आदिंसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावून कव्वालीचा आनंद लुटला.