Breaking News

विजबिल भरुनही रोहित्र मिळेना! शेतकऱ्यांची व्यथा

कोपरगाव ता. प्रतिनिधी - यावर्षी विहीरींत समाधानकारक पाणी आहे. कालव्यांना आवर्तनेही येऊन गेली आहेत. पिके अंतिम टप्प्यात आहेत. मात्र दात आहेत तर चणे नाही आणि चणे आहेत तर दात नाही, अशी व्दिधावस्था शेतकऱ्यांची झाली आहे, अशी खंत सवंत्सरचे शेतकरी अशोक लोहकणे यांनी ‘दै. लोकमंथन’कडे व्यक्त केली. विशेष म्हणजे महाविरण कंपनीने विजबिल थकीत नसतानाही इतरांच्या थकबाकीपोटी नादुरुस्त रोहित्र बदलून देता येत नसल्याचा पवित्र घेतला आहे. विजबिल भरुनही रोहित्र मिळत नसल्याने येथील शेतकरी मेटाकुटीस आले आहे. 

सवंत्सर शिवारातील रोहित्र {क्रमांक ४२०६२०३} पाच ते सहा दिवसांपूर्वी नादुरुस्त आहे. या रोहित्रावरील ४ शेतकरी वगळता इतर २२ शेतकऱ्यांची विजबीले थकबाकीत आहेत. मात्र अशोक लोहकणे यांच्याकडे महावितरणाची कुठलीही थकबाकी नाही. केवळ थकबाकी वसुलीच्या कारणाने महावितरणाने रोहित्र बदलून देण्यास नकार दिला आहे.