Breaking News

जगदंबा सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर चांदगुडे

कोपरगाव : तालुक्यातील चासनळी येथे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्याने स्थापन झालेल्या जगदंबा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रभाकर विक्रम चांदगुडे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी श्रीमती कमलाबाई आहेर यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी आर. पी. वाघ यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली. या निवडीबद्दल माजी आ. अशोक काळे, युवा नेते आशुतोष काळे, चैताली काळे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.