Breaking News

नगरची ‘शिळ’ पुण्यात घुमली!


अहमदनगर येथील संजय कुलकर्णी यांच्या ‘शिळ वादना’चा कार्यक्रम पुण्याच्या अहमदनगर मित्रमंडळाने गरवारे विद्यालयाच्या सभागृहात आयोजित केला होता. यानिमित्ताने नगरची शीळ पुण्यात घुमली. 

यावेळी श्रीराम चौधरी, सुधीर दारव्हेकर, किशोर तळेगांवकर आदी उपस्थित होते. संजय कुलकर्णी यांनी 'गजानना श्री गणराया..' हे गीत शीळेवर गाऊन मैफिलीचा शुभारंभ केला. ‘पायो जी मैने राम रतन धन पायो..’ हे शीळेवरील गीत गाताना अनेकांनी ताल धरला होता. 'चंदन सा बदन...' हे गीत शीळेवर ऐकताना सर्वांचे भान हरपले होते. रोझा चित्रपटातील 'तुहीरे तुहीरे....' हे गीतही त्यांनी बहारदारपणे गायिले. 'होटोसे छुलो तुम...' ही गझल अनेकांना भावली. 'येऊ कशी कशी मी नांदायला...?' या लावणीवर उपस्थित सर्वांनीच ठेका धरला होता. 'ये मेरे वतन के लोगो...' या देशभक्तीपर गीताने संजय कुलकर्णी यांनी या मैफिलीची सांगता केली.

कार्यक्रमास सर्वश्री विजय कोटस्थाने, महेश जोशी, बापू पोतदार, देखणे काका, सौरभ गंधे, भाग्यश्री गंधे, शिवानी गंधे, ज्योती कुलकर्णी आदींसह अहमदनगर मित्र मंडळाचे पुण्यातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुधीर दारवेकर यांनी आभार मानले.