दखल - कडव्या हिंदुत्ववादाचा पराभव
गेल्या आठवड्यात त्रिपुरातील डाव्यांची 25 वर्षांपासूनची सत्ता उलथवून टाकल्यानंतर भाजपला आता देशावर आपला एकछत्री अंमल असल्याचा दुराभिमान वाटायला लागला होता. विजयाचा उन्माद चढला. त्यातून लेनिन, पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची विटंबना घडली. देशात विकासाऐवजी उन्मादाचं राजकारण सुरू झाल्याचा संदेश जनतेत गेला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, स्वातंत्र्यववीर सावरकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांची विटंबना क्रियेतून प्रतिक्रिया घडल्यासारख्या झाल्या. हे दोन्ही प्रकार चुक ीचेच होते. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षांपासून भाजपची सत्ता आहे.
योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्त्व आता उत्तर प्रदेशापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतरचं दुसरं स्थान दिलं जातं. गुजरात, केरळ आदी राज्यांत त्यांना स्टार प्रचारक म्हणून बोलवलं जात होतं. अशा परिस्थितीत योगी आदित्यनाथ ज्या मतदारसंघातून सलग पाच वेळा व त्यांचे गुरू अवैैद्यनाथ त्याअगोदर दोन वेळा निवडून आले आणि जिथं 28 वर्षांपासून कमळ फुलत होतं, तिथं ते कोमेजलं, हा भाजपला बसलेला धक्का असल्याचं मानलं जात असलं, तरी प्रत्यक्षात या पराभवामुळं योगी आदित्यनाथ विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा असं चित्रं पुढं आलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या सत्तेच्या काळात गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न झाला; परंतु त्याला मर्या दित यश आलं. योगी आदित्यनाथ यांची हिंदू युवा वाहिनी ही संघटनाच अनेकदा कायदा हातात घेत आहे. इतरांवर हल्ले करीत आहेत. त्यामुळं नागरिकांना या राज्यात अराजक आहे, की काय असं वाटायला लागलं आहे. शेतीचं ठरावीक मर्यादेपर्यंतचं कर्ज माफ करण्यात आलं; परंतु शेतीमालाला भाव नाही. बटाटा उत्पादक शेतकरी प्रथमच रस्त्यावर आला आहे. शेतीसाठी कितीही धोरणं आखली जात असली, तरी शेतकरी त्यावर समाधानी नाही. उत्तर प्रदेशातील ऊस उत्पादकांची हजारो कोटी रुपयांची देणी थकली आहेत. विधानसभेसमोर बटाटे फेकण्याचं आंदोलन झालं; परंतु त्याची संभावना विरोधकांचं कृत्य अशी करण्यात आली. शेतकर्यांची उपेक्षा करण्यात आली. ग्रामीण भागातून त्यामुळं भाजपविरोधात नाराजी होती. तिथंच मतदानाचं प्रमाण अधिक झालं. भाजपचा पाठिराखा असलेला व्यापारी व शहरी मतदार मतदानासाठी फारसा बाहेर आला नाही. केंद्र सरक ारच्या व्यापार आणि आर्थिक धोरणाविरोधात हा गटही नाराज आहे. शहरी भागात कमी झालेल्या मतदानाचा फटकाही भाजपला बसला. योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातील कुपोषणाची आणि बालमृत्यूची प्रकरणं देशभर गाजली. एकीकडं योगी आदित्यनाथ केरळमध्ये जाऊन उत्तर प्रदेशातील आरोग्येसेवेचा आदर्श घेण्याचं आवाहन करीत असताना त्यांच्याच राज्यातील आरोग्य विभागाची लक्तर वेशीवर टांगली जात होती. उलट, सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं एका पतीला आपल्या पत्नीचा मृतदेह हातगाडीवरू न 15 किलोमीटर न्यावा लागला. गुंतवणूक परिषद घेऊन योगी आदित्यनाथ विकासाचं राजकारण पुढं नेत असताना त्यांचे सहकारी मात्र ताज महाल, ‘लव जिहाद’ सारखे विवादास्पद मुद्दे काढीत होते. सहारनपूरसारख्या दंगलीतून दलित विरुद्ध ठाकूर असं चित्र पुढं आलं. विवादास्पद मुद्द्यांमुळं दलित, मुस्लीम आणि शेतकरी हा घटक सत्ताधारी भाजपपासून दुरावत चालला. भाजपचं आव्हान मोठं आहे. एकत्र आलो नाही, तर अस्तित्त्वाचाच प्रश्न आहे. आक्रमक हिंदुत्वाला उत्तर एकत्र येण्यातूनच दिलं जावू शकतं, असं समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्षाच्या लक्षात आलं. अखिलेश यादव यांनी यापूवीर्ही मायावती यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं; परंतु त्या वेळी त्यांनी ते मानलं नाही. 1995 मध्ये समाजवादी पक्षाच्या गुंडांनी मायावती यांच्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नव्हता. बदलत्या राजकीय परिस्थितीत दोन्ही पक्ष एक त्र आले. ‘बुआ’ मायावती आणि ‘भतीजा’ अखिलेश यादव यांचं भांडण मिटलं. दलित, मुस्लीम समाजाचा या दोन पक्षांच्या नेत्यावर एकत्र येण्यासाठी दबाव होता. बसपनं विनाशर्त पाठिंबा जाहीर केला. गोरखपूर आणि फुलपूर मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीकरिता समाजवादी पक्ष आणि बसप एकत्र आले. राज्यसभा व लोकसभेच्या निवडणुकीच्या नि मित्तानं का होईना, देवघेव स्वरुपात हे पक्ष एकत्र आले. त्यामुळं मतविभागणी टळून गोरखपूर व फुलपूर या दोन मतदारसंघात भाजपचा पराभव करता आला. उत्तर प्रदेशात बाबरी मस्जिद पाडल्यानंतरच्या उन्मादी वातावरणात कडव्या हिंदुत्त्वाच्या विरोधात हे पक्ष एकत्र आले होते. त्यांनी तिथं भाजपचा पराभव केला होता. आता त्याची पुनरावृत्ती घडली आहे. गेल्या 28 वर्षांपासून गोरखपूर मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व होतं. योगी आदित्यनाथांच्या पीठाचं त्यात महत्त्वाचं योगदान आहे. योगी आदित्यनाथ पाचदा तर त्यांच्याअगोदर गुरु अवैद्यनाथ दोनदा निवडून आले होते. आता योगी आदित्यनाथ यांनी सुचविलेली तीनही नावं डावलून उपेंद्र यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे ते उमेदवार असले, तरी योगी आदित्यनाथ यांचे ते नव्हते. त्यामुळं त्यांचा तिथं पराभव झाला. भाजपतील गटबाजी यानिमित्तानं चव्हाट्यावर आली. भाजपचे नेतेही वा हिन्यांवर तसंच सांगत असले, तरी मग पक्षाध्यक्षाचा उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांकडून पराभूत केला जात असेल, तर पक्षविरोधी कारवाईची शिक्षा करण्याचं धाडस आता दाख विलं जाणार का, हा प्रश्न आहे. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी केल्यानं समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. पोटनिवडणुकीत अ खिलेश यादव चलाखीनं काँगे्रसपासून लांब राहिले. निदान तसं चित्र निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले.
गोरखपूर आणि फुलपूर या दोन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय होती. गोरखपूर हा योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ तर फुलपूर के शवप्रसाद मौर्य यांचा मतदार संघ. विधानसभा निवडणुकीत सप आणि बसप यांच्यातील मतविभाजानाचा फायदा भाजपला झाला होता. त्यामुळं या पोटनिवडणुकीत अखिलेश यादव यांनी दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. उत्तर प्रदेशच्या राजकारणात ‘बुआ-भतिजा’ (आत्या आणि भाचा) एकत्र आल्यानं भाजपविरोधी मतांचं विभाजन टळलं. बिहारमध्येही भाजपविरोधात नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र आल्यानंतर भाजपचा पराभव झाला होता.
आता नितीशकुमार पुन्हा
भाजपसोबत गेले असले, तरी विरोधक एकत्र आल्यास भाजपचा पराभव शक्य असल्याची जाणीव अखिलेश यादव यांना झाली होती. मायावतींसह अखिलेश यादव यांनी आठ लहान छोटया पक्षांचा पाठिंबा मिळवला. या पक्षांची व्होटबँक एका जातीपुरती मर्यादित असली, तरी त्याचा फायदा अखिलेश यादव यांना झाला. गोरखपूरमध्ये त्यांनी निर्बल इं डियन शोषित हमारा आम दल (निशाद) आणि पीस पार्टीशी युती केली. यानंतर त्यांनी प्रवीण निशाद यांना उमेदवारी दिली. ते ‘निशाद’चे प्रमुख संजय निशाद यांचे चिरंजीव आहेत. ओबीसी समाजात ‘निशाद’च्या मतदारांचं प्रमाण लक्षणीय आहेत, तर फुलपूरमध्ये त्यांनी नागेंद्र प्रतापसिंह पटेल यांना संधी दिली. फुलपूरमध्ये पटेल समाजाचं वर्चस्व आहे. बसपसह राष्ट्रवादी काँगे्रस, डावे पक्ष यांचा पाठिंबा देखील त्यांनी मिळवला होता. अति आत्मविश्वासामुळे पराभव झाल्याचं भाजपचे नेतेच सांगत आहेत. मात्र, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी गेल्या 15 दिवसांत अथक मेहनत घेत चित्र बदलून टाकलं, याकडं दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांच्या तीन खेळींनी भाजपचा खेळ खल्लास झाला आणि समाजवादी पक्षानं हे अनपेक्षित यश मिळवलं.