सरकारमधील मतभेदांचा फायदा लाटण्याचा साबांच्या भ्रष्ट अभियंता लॉबीचा डाव
सत्ताधारी भारतीय जनता पक्षात धुमसत असलेल्या सुप्त मतभेदांना चेतवून त्या आगीत आपला भ्रष्टाचार जाळण्याची खेळी करण्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्ट अ भियंत्यांची फळी यशस्वी झाल्याचे संकेत आहेत. महाराष्ट्र भाजपातील शिरोमणी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यातील मतभेदाचा फायदा घेऊन शहर इलाखा साबां विभागात कार्यरत आजवरच्या तीन चार कार्यकारी अभियंत्यांसह मुंबई साबांत मुख्य अभियंता आणि अधिक्षक अभियंता म्हणून जबाबदारी सांभाळतांना वादग्रस्त ठरलेले धनंजय धवड यांच्या इशार्यावर नाचणारे चेहरे आपल्या कुट नितीला अंजाम देण्यात आघाडीवर असतांना स्वपक्षाच्या सात आमदारांचेही या खेळीतील योगदान महत्वाची भुमिका बजावत आहे. दरम्यान भाजपाच्या राष्ट्रीय फळीतील अत्युच्च नेत्याची पुणे सर्कीट हाऊस मध्ये झालेली ती बैठक या सर्व डावपेचांवर कशी मात करते, यावर महाराष्ट्र भाजपातील मतभेदांचे परिणाम अवलंबून असले तरी शहार इलाखा विभागात आपल्या कर्तृत्वाने चर्चेत असलेल्या एका कार्यकरी अभियंत्याला मोठी किंमत मोजावी लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणावर सहकार चळवळीचा प्रभाव आहे, ही आजवरची परंपरा मोडीत निघून सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असलेल्या भ्रष्ट लॉबीने महाराष्ट्राचे राजकारण विशेषतः सत्ताधारी पक्ष हायजॅक केला असावा, अशी शंका गेल्या दहा-बारा वर्षात घडलेल्या घडामोडींवरून समोर येऊ लागले आहे.
छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार आल्यापासून सार्वजनिक बांधकाम खात्यात कार्यरत असलेली भ्रष्ट अभियंत्यांची लॉबी शिरजोर बनली. अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता साबां सचिव अशी उच्च पदे भुषवून सेवा निवृत्त झालेले धनंजय धवड, अधिक्षक अभियंता, मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असलेले उल्हास देबडवार, अ धिक्षक अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता किशोर पाटील, पी. के. पाटील, रणजीत हांडे, प्रज्ञा वाळके या मंडळींनी साबां मंत्री म्हणून काम करणारे छगन भुजबळ आ णि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना वेगवेगळी माहीती पुरवून दोघांचीही दिशाभूल केली. त्यांनी सरकारला अंधारात ठेवून केलेल्या कारवायांचा परिणाम महाराष्ट्रासमोर आहे.
साबांची ही लॉबी विद्यमान साबां मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संदर्भात भुतकाळातील थेअरी वापरून भुजबळांवर केलेले प्रात्याक्षिक चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर गेल्या तीन वर्षापासून करीत आहे. ही चाल कामयाब व्हावी म्हणून पक्षांतंर्गत मतभेदाचांही फायदा उठविण्यात कसूर केली जात नाही.
शहर इलाखा साबां विभागात सुरू असलेल्या अनियमित सावळा गोंधळाचा अलगद लाभ घेऊन हे प्रकरण निकाली निघणार नाही, अशी व्यवस्था करून चंद्रकांत दादा पाटील यांना बदनाम करण्यात वेगवेगळे फंडे वापरले गेले. छगन भुजबळ यांच्या कार्यकाळातही हीच खेळी खेळण्यात आली होती. अगदी क्लीन चीट अहवालाचा गोंधळही याच हेतूने घातला गेला. एकाच वेळी भुजबळांसमोरील अडचणीत भर टाकून चंद्रकांत दादांची बदनामी करण्याचा कुटील हेतू यामागे होता. तात्पर्य हे की शहर इलाखा साबां विभागातून या मंडळींनी सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील अंतर्गत कुरबूरींचा फायदा घेण्याची परंपरा कायम ठेवल्याचे उघड झाले आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपात सर्वोच्च पद भुषविणार्या एका नेत्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या लॉबीने चंद्रकांत दादांना शह देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यात भाजपाच्याच सात आमदारांनीही आपले योगदान दिल्याचे वृत्त असून या खेळीत एका कार्यकारी अभियंत्याला मात्र मोठी किंमत मोजावी लागेल, असेही सुत्रांचे म्हणणे आहे.