Breaking News

‘अँटी स्पिटिंग’साठी कायदा करणार - डॅा. दीपक सावंत

राज्य शासन येत्या काळात ‘अँटी स्पिटिंग’वर बंदी आणण्यासाठी कायदा करणार आहे. यासाठी काय शिक्षा असावी, यासंदर्भातील प्रारूप तयार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॅा. दीपक सावंत यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले.

राज्य शासनामार्फत 1 ते 31 डिसेंबर मैाखिक तपासणी मोहीम आयोजित करण्यात आली होती. 1 ते 31 डिसेंबर या एका महिन्यात दोन कोटींवर नागरिकांची मैाखिक आरोग्याची तपासणी क रण्यात आली आहे. यापैकी सुमारे एक टक्के नागरिक हे मैाखिक कर्करोगाने ग्रस्त असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात कॅन्सर इन्स्टिट्युटच्या माध्यमातून तपासणी सुरू असून त्यांना आवश्यक ते उपचार शासनामार्फत करण्यात येणार आहे. यासोबतच प्रेरणा दलामार्फत 14 हजार व्यसनाधीन लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. ई सिगारेटपासून मुक्ती आवश्यक असून हायप्रोफाईल लोक ांमध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात आढून येते. त्यामुळे ई सिगारेटसवरही बंदी आवश्यक आहे. शासन जनतेच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेत असून विविध माध्यमातून त्यांना व्यसनांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री. सावंत यांनी यावेळी बोलताना सांगितले.