‘कोटपा’ कायद्यांतर्गत हुक्का पार्लर आणणार - डॅा. रणजित पाटील
सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने यांच्या प्रतिबंधासाठी असलेल्या ‘कोटपा’ या कायद्यांतर्गत हुक्का पार्लर आणणार असल्याचे गृह राज्यमंत्री (शहरे) डॅा. रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले.
कोटपा कायद्यांतर्गत राज्यातील पोलिस दलामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा दर महिन्याला आढावा घेण्यात येत आहे. गुन्हे अहवालात याचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासन सिगरेट आणि इतर तंबाखुजन्य उत्पादने यांच्या प्रतिबंधासाठी गंभीर आहे. राज्यातील 70 हजार शाळांमध्ये धूम्रपानबंदीच्या पाट्या लावण्यात आल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.