Breaking News

गुटखा बंदीचा कायदा अधिक कडक करणार - गिरीश बापट


मुंबई, - गुटखाबंदीसाठी प्रबोधनाबरोबरच कायद्याचा धाक असणेही गरजेचे आहे. यासाठी गुटखाबंदीचा कायदा अधिक कडक करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना सांगितले. 

सदस्य प्रकाश गजभिये यांनी धूम्रपानबंदीविषयीची अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. यास श्री. बापट यांच्यासह आरोग्य मंत्री डॅा. दीपक सावंत आणि गृह राज्यमंत्री (शहरे) डॅा. रणजित पाटील यांनीही उत्तरे दिली. गुटखाबंदीचा नवीन कायदा हा कठोर असणार आहे. या कायद्यात किमान तीन वर्षे ते कमाल जन्मठेपेची शिक्षा असणार आहे. कायद्यासोबतच जनजागृती व प्रबोधन आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांच्या प्रबोधन आणि शिक्षणाची गरज आहे. हा विषय अत्यंत संवेदनशील असून यासाठी समाजाचे सहकार्य आवश्यक असल्याचे श्री. बापट यांनी यावेळी बोलताना सांगितले.