Breaking News

राज्यातील पाठ्यपुस्तकांचे कॉपीराईट होणार


मुंबई : राज्यातील पाठ्यपुस्तकांचे कॉपीराईट करणार, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली. परीक्षेसाठी शासन पूरक साहित्य छापणार असल्याचेदेखील ते पुढे म्हणाले. राज्यातील पाठ्यपुस्तकांचे कॉपीराईट करण्यात येणार आहे. त्यामुळे यापुढे गाईड तयार करण्यासाठी कॉपीराईट ऍक्ट लागू करण्यात येईल. कॉपीराईटशिवाय गाईड तयार करता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. परीक्षेसाठी शासन पूरक साहित्य छापणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.