Breaking News

अभिषेक मनू सिंघवी प. बंगालमधून राज्यसभेसाठी ?


नवी दिल्ली : काँग्रेस नेते अभिषेक मनू सिंघवी यंदा पश्‍चिम बंगालमधून राज्यसभेसाठी निवडणूक लढविणार आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर ते राजस्थानऐवजी पश्‍चिम बंगालमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. मात्र स्थानिक काँग्रेस नेत्यांना या निर्णयाबद्दल पूर्वकल्पना नसल्याचे समोर येते आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प. बंगालमधील विरोधी पक्षनेते अब्दुल मनन यांना फोनवरुन या निर्णयाची माहिती दिली. दरम्यान, अभिषेक सिंघवी यांना पश्‍चिम बंगालमधून लढविण्याचा पर्याय का देण्यात आला, याबद्दल तर्क वितर्कांना उधाण आले आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक नेत्यांचा पत्ता कापला जाणार, असे दिसत आहे.