नाथांच्या वाड्यातून निघाली निर्वाण दिंडी
पारंपारिक अभंगाला सुरवात करून बुधवारी {दि. ७} दुपारी गावातील नाथ मंदीरामधून निर्वाण दिंडी निघाली. येथून कावळेगल्ली, उदासी महाराज मठ, वाळवंटमार्गे नाथांच्या समाधी मंदीरात ही दिंडी पोहोचली.
या दिंडीमधे सर्वांचा चालण्याचा क्रम परंपरेनुसार ठरलेला असल्याने सुरुवातीस घोडा या नंतर पटका, भानुदास महाराजाचे निशाण, झेंडेकरी, दिंडी, विणेकरी, अमृतराय संस्थानची छत्री, नाथवंशीयाच्या छत्र्या, अमळनेरकर महाराज दिंडी, भगवानगडची दिंडी, तसेच सर्व वारकरी अशा क्रमाने ही दिंडी नाथांच्या समाधी मंदीरात पोहोचली. येथे वारकरी व नारदीय किर्तनात ’अवघे चित्रलौक्य आनंदची आता’ हा संत एकनाथ महाराजाचा अभंग घेतात. किर्तनानंतर दिंडी गावातील नाथ मंदीरात आली. भानुदास महाराजांचे निशाण महाद्वारला लावून दिंडीच्या सांगतेची आरती झाली.