लाखो वारकऱ्यांनी केली पसायदानातून प्रार्थना
शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या जलसमाधी (षष्ठी) सोहळ्याच्या निमित्ताने {दि. ७} दुपारी अडीचच्या सुमारास लाखो वारकऱ्यांनी नाथांच्या प्रतिष्ठाननगरीत {पैठण} संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. ‘'हे विश्वची माझे घर’ समजून शांतीचा संदेश शिस्त आणि शांतपणे एकाच वेळी एकाच क्षणी आहे, त्या जागेवर उभं राहून संपूर्ण वाळवंटातील व नाथषष्ठीतील वारकऱ्यांनी पाच मिनिटे प्रार्थना केली.
हा अदभूत सोहळा पाहण्यासाठी व सहभागी होण्यासाठी पैठणकरांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. सद्य:स्थितीत समाजा-समाजात तंटे, भेदाभेदामुळे दरी निर्माण होत आहे. विभक्त कुटुंब व्यवस्थेमुळे परस्परातील नाते संबंध दुरावत आहेत. अशा परीस्थितीमुळे या विश्वात शांती नांदण्याची गरज आहे. मन:शांती, आत्मशांती, वारकरी संप्रदायात शिस्त व सातत्याने टिकून आहे. केवळ आपणच सुखी, शांत राहून चालणार नाही. तर संपूर्ण विश्वातही शांतता नांदली पाहिजे. शेतकरी, कष्टकरी सुखी झाला पाहिजे, या उद्देशाने माऊली संस्थानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर (आपेगाव), नाथ संस्थानचे अध्यक्ष आ. संदीपान भुमरे (पैठण), प्रा. छावा संघटनेचे राज्याध्यक्ष चंद्रकांत भराट यांच्या संकल्पनेतून पैठणमध्ये माऊलीचा पसायदान म्हणून विश्वशांतीचा हा प्रार्थना सोहळा यशस्वी झाला.