साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयास गुरुवारी {दि. ८} सकाळी आठ वाजता संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे हे भेट देऊन रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याशी त्यांच्या अडीअडचणीसंदर्भात चर्चा करणार आहे, अशी माहिती साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. पी. एम. मुरंबीकर यांनी दिली. ते म्हणाले, साईबाबा संस्थानच्या रुग्णालयाव्दारे विविध आजारांवर उपचार केले जातात. यामध्ये हृदयशस्त्रक्रिया, आर्थो, डेंटल, जनरल सर्जरी, युरो सर्जरी आदि विभाग कार्यरत आहेत. या विभागांव्दारे रुग्णांवर विविध शस्त्रक्रिया केल्या जातात.
डॉ. हावरे रुग्णांना भेटणार
Reviewed by Dainik Lokmanthan
on
11:24
Rating: 5