Breaking News

अत्याचार करणार्‍या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे..मुलीला न्याय मिळालाच पाहिजे...अशी गहिवरलेली हाक देत पीडित मुलीच्या आईने पोलीस स्थानकातच टाहो फोडला..साहेब त्या नराधमाला सोडूच नका फाशीची शिक्षा द्या..अशी एकमुखी मागणी आज शाळकरी मुली, गृहिणीसह शहरातील विविध महिला संघटना यांनी पोलीस निरीक्षक बशीर शेख यांचेकडे केली.अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा निषेध नोंदवत पोलीस स्थानकावर आज महिलांनी मोर्चा काढत निषेध नोंद विला..पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना यावेळी निवेदन देण्यात आले..अविनाश उर्फ विशाल संतोष सरक याने पाच वर्षांच्या बालिकेला मोबाईल खेळण्याच्या बहाण्याने त्याच्या घरात बोलावून तिच्यावर ( दि.19 ) अतिप्रसंग केला होता.. मजुरी करून घरी परतलेल्या आई - वडिलांना पीडित बालिकेने दुपारी आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला त्यानुसार बालिकेच्या आईने पोलिसांत फिर्याद दाखल केली होती..या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी आज शिवस्फूर्ती मैदान येथून मोर्चा काढण्यात आला..एकविरा देवी मंदीर..देवकर गल्ली.. कालिका माता मंदिर..भेंडी बाजार रोड.. महात्मा फुले चौक..गांधी चौक..रेल्वे गेट..स्टेशन रोड मार्गे पोलीस स्थानकात दाखल झाला..मोर्चाचे नेतृत्व संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, प्रशांत शर्मा, बापू जाधव, संजय मोकळ, आकाश हिरे, किरण शिंदे आदींनी केले..पोलीस स्थानकात महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली..माणुसक ीला काळिमा फासणारी हि घटना असून पोलिसांनी योग्य तो तपास करून यातील संशयितास कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी पोषण आहार संघटनेच्या संगीता सोनवणे यांनी केली तर या घटनेमुळे शहरातील महिलांना असुरक्षिततेची भावना वाटत आहे..कुठल्याही परिस्थितीत त्या संशयितांची सुटका होऊ नये..पुन्हा अशी घटना होऊ नये.यासाठी नव्याने कायदा काढावा अशी मागणी स्मिता दंडगव्हाळ यांनी आपल्या मनोगतातून केली..यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष किरण देवरे,भीमशक्तीचे मनोज चोपडे,सुनील जाधव, प्रशांत शर्मा, संजय मोकळ आदींनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवीत पुरवणी आरोपपत्र दाखल करून संशयितास कडक शासन व्हावे अशी मागणी केली.. दरम्यान, आपल्या तीव्र भावना समजू शकतो..घडलेली घटना ही घृणास्पद असून संशयितास कडक शासन होईलच क ठोरात कठोर शिक्षा संशयितास होईल तशी तरतूद कायद्यात आहे..योग्य ते पुरावे गोळा करून त्यास शिक्षा देऊन पीडित बालिकेला न्याय मिळेल अशी ग्वाही यावेळी पोलिस निरीक्षक बशीर शेख यांनी मोर्चेकर्‍यांना उत्तर देतांना दिली..या मोर्चात माजी उपनगराध्यक्ष चंद्रशेखर कवडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख किरण देवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता,होलार समाज संघटनेचे सुनील जाधव, भाजप शहराध्यक्ष उमेश उगले, निलेश पगारे,संजय मोकळ, संजय कदम, वाल्मिक जगताप,भीमशक्ती संघटनेचे मनोज चोपडे,सचिन देवकते,संगीता वाघ,संगीता सोनवणे,तुषार पांडे,होलार समाज संघटना,विश्‍वकर्मा सुतार संघटना,किरण शिंदे,सुमित सोनवणे यांचेसह संगीता वाघ, संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, लता जाधव,शाहीन काझी, उषा शिंदे,अनिता गांगुर्डे,शुभांगी पांढरे,मुमताज शेख,ज्योती मोरे,सुनीता सूर्यवंशी, कविता तायडे,कावेरी शर्मा, ज्योती मोरे, शालिनी पगारे,अनिता मोरे, ज्योती सोनवणे,रेखा पाठक, सुलोचना ननावरे,सुवर्णा सोनवणे,विठाबाई महाजन, नंदाबाई मोरे, गंगुबाई शिंदे, संगीता शिंदे,सुशीला निकम,तृप्ती त्रिभुवन रुतीका नेमनर,श्रद्धा पिंगळे आदींसह शहरातील विविध भागातील महिला या मोर्चात सहभागी झाल्या होत्या.