Breaking News

जैन ओसवाल धर्मशाळेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार


जैन ओसवाल धर्मशाळेच्या विविध पदांची नुकतीच पदश्रेणी जाहीर झाली. नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. जैन ओसवाल धर्मशाळेत माजी संस्थापक चेअरमन सुभाष मुथा यांची उपाध्यक्षपदी, राजेंद्र गांधी यांची सरचिटणीस पदी, संपत बाफना यांची खजिनदारपदी, विलास गांधी यांची चिटणीसपदी निवड करण्यात आली. यावेळी संचालक सुवर्णा डागा, संतोष गांधी, शैलेश गांधी, सचिन सोनी, विनोद चंगेडीया, विजय गुगळे, व्यवस्थापक प्रशांत भंडारी, कर्मचारी व सभासद उपस्थित होते. 
यावेळी बोलताना सुभाष मुथा म्हणाले की, संस्थापक अध्यक्ष काळात केलेले कार्य व सर्वांची मिळालेली साथ यामुळे पतसंस्थेने केलेल्या प्रगतीत सिंहाचा वाटा असल्याची जाणीव सर्वांनाच आहे. अनेक युवकांना यातून रोजगार उपलब्ध झाला, याचे समाधानही आहे. छोटेसे लावलेले रोपटे आज बहारदार वृक्ष झाल्याचे पाहताना अत्यंत आनंद होत असून जैन ओसवाल सहकारी पतसंस्थेतर्फे होणारा सत्कार व सन्मान मोलाचा आहे.