शासनाची फसवणूक
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती योजनेसाठी पात्र नसतानाही खोटी कागदपत्रे सादर करुन एकाच कुटुंबातील वडील-मुलीने बेकायदेशीरपणे याचा लाभ घेतल्याचा आरोप सोपान भगत यांनी केला असून यावर कारवाई करावी या मागणीसाठी तहसीलदारांकडे निवेदन दिले आहे.
घटस्फोटीत नसतानाही असल्याबाबतची खोटी कागदपत्रे बनवून शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून मासिक मानधनाचा लाभ घेतल्याकडे भगत यांनी संबंधितांचे लक्ष वेधले आहे. याबाबत चौकशीचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.