Breaking News

समाजकंटकांना तात्काळ अटक करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन



लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, क्रांतीगुरू लहूजी वस्ताद साळवे यांच्या तैलचित्राच्या विटंबनेबाबत समाजकंटकांस कडक शासन करण्याबाबद समस्त अहमदनगर येथील मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.यामध्ये ज्यांनी मराठी भाषेचा झेंडा अटकेपार सातासमुद्रापार रोवला, अफाट साहित्य संपदा निर्माण केली, दलित शोषित, शेतकरी तथा कामगारांच्या प्रश्‍नासाठी लढा दिला. तसेच सर्वात महत्वाचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असणारे लोकशिक्षक अण्णाभाऊ साठे तसेच ज्यांनी जगेल तर देशासाठी, मरेण तर देशासाठी अशी भिष्मप्रतिज्ञा करून आजन्म ब्रम्हचर्य पत्करून वयाची 87 वर्षे देशसेवा केली. क्रांतीकारक तथा समाजसेवक ज्यांनी निर्माण केले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सिंहाचा वाटा असणारे भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक आद्यक्रांती गुरू लहूजी वस्ताद साळवे या दोन्ही महापुरूषांची चार दिवसांपुर्वी कोणीतरी अज्ञात समाजकंटकाने अकोले येथील उमरी परिसरात त्यांचे संयुक्तरित्या असलेले तैलचित्र फाडून विटंबना केली. तरी समाज कंटकांचा तात्काळ शोध घेवून त्यास कडक शासन करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 
यावेळी सागर साळवे, रोहित शिंदे, गणेश अडागळे, आकाश लोखंडे, सचिन पवार, सागर खरे, राहूल काळे, रोहित वैरागर, प्रकाश लोखंडे, आकाश साबळे उपस्थित होते.