Breaking News

धोक्यात आलेल्या काजू उद्योगाबाबत उपाययोजनेची मागणी

रत्नागिरी, दि. 03, मार्च - कोकणातील सर्वांत महत्त्वाचा रोजगार उपलब्ध करून देणारा काजू उद्योग सध्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सरकारच्या दुर्लक्षामुळे अडचणीत आला आहे. दुसरीकडे बाहेरच्या देशातील कमी किमतीचा व दर्जाहीन काजू भारतात आणून कोकणातील काजू म्हणून विक्री केली जात आहे. हा प्रकार न थांबल्यास कोकणचा चविष्ट क ाजूगर ही ओळख पुसायला वेळ लागणार नाही. ही बाब लक्षात घेता शासनाने याबाबत ठोस उपायोजना करण्याची मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते व स्वामी समर्थ क ाजू व्यवसायाचे संचालक प्रताप पवार यांनी केली आहे. 


याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पवार यांनी त्यांनी म्हटले आहे की, काजू हा मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देणारा तसेच शेतकर्‍यांना आर्थिकदृष्टया समृद्ध करणारा व्यवसाय आहे. यातूनच गेल्या काही वर्षांत अनेक स्थानिक शेतकर्‍यंनी काजू बागा तयार केल्या आहेत. मात्र, हा उद्योग अनेक कारणांनी अडचणीत आला आहे. कोकणातील या काजूवर क ारखान्यात प्रक्रिया केल्या जाव्यात यासाठी शासनाने विविध योजना, धोरणे आखून कारखानदारांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अनेक तरुण या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात. मात्र बँकांच्या जाचक अटींमुळे पुरेसे आर्थिक पाठबळ मिळत नसल्याने ते मागे पडतात. यासाठी शासनाने छोट्या यशस्वी उद्योजकांना आर्थिक सक्षम केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालू शकतो. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी व सरकारचे दुर्लक्ष यामुळे येथील छोटा उद्योजक आज दुर्बल बनला आहे.
शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव मिळतो तर शेतकरी व कारखानदार यांच्यातील दुवा असणार्‍या दलालांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळतो. कारखानदार केवळ तीन महिन्यांमध्ये क ाजू बी गोदामामध्ये साठवणूक करतात. पुढील आठ ते दहा महिने कारखानदार वर्षभर प्रक्रिया उद्योग चालवून रोजगार उपलब्ध करून देत असतात. मात्र, तरीही अनेकदा त्यांना मंदीचा सामना करावा लागतो. काजूगराला योग्य भावव मिळत नाही व परिणामी कारखानदाराला तोटा सहन करावा लागतो. म्हणूनच काजू उत्पादक शेतकर्‍यांनीही कारखानदारांची बाजू समजून घेत व आपल्या आडमुठ्या भूमिकेत बदल करून काजू बीचा दर योग्य प्रमाणात स्थिर ठेवल्यास सर्वांचाच फायदा होणार आहे, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. क ारखानदारांकडे पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याने गुजरात, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गोवा, केरळ येथील कारखानदार पैसा घेऊन येऊन कोकणातील काजू बी अधिक दराने विकत घेतात. वाढलेल्या या दराचा त्रास स्थानिक कारखानदाराला सहन करावा लागतो. या कारणामुळे कोकणातील प्रक्रिया कमी होऊन रोजगारालाही खीळ बसली आहे.