Breaking News

आश्रय सेवा संस्थेतर्फे रत्नागिरीत विद्यार्थ्यांकरिता वैज्ञानिक केंद्र

रत्नागिरी, दि. 03, मार्च - आश्रय सेवा संस्थेतर्फे रत्नागिरीत लवकरच अँक्टिव्हिटी सेंटर चालू करण्यात येणार आहे. शालेय विद्यार्थ्यांना वैज्ञानिक उपकरणे सहज उपलब्ध होण्याकरिता व विविध प्रयोग करण्याकरिता या सेंटरचा उपयोग होणार आहे. संस्थेने गेल्या तेरा वर्षांत राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांतून 5 हजाराहून अधिक विद्यार्थी संलग्न झाले आहेत.

रत्नागिरी शहरात अ‍ॅाक्टिव्हिटी सेंटर चालू केले जाणार आहे. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू आहे. देणगीदारांच्या मदतीने प्रयोगशाळेत लागणारी नवनवीन उपकरणे खरेदी क रण्यात येणार आहेत. दर शनिवार-रविवारी अ‍ॅचक्टिव्हिटी सेंटर चालू ठेवून विद्यार्थ्यांना प्रयोगाची संधी मिळेल. गेल्या आठवड्यात संस्थेतर्फे कर्णबधीर विद्यार्थ्यांमध्ये अशा क ार्यशाळेद्वारे कुतूहल निर्माण केले होते. शाळांमध्ये विज्ञानाचा प्रचार करण्याचे महत्त्वाचे काम संस्था करत आहे.