Breaking News

गोदावरी पूल आणि शासकीय इमारत विकासकामांच्या साक्षीदार : काळे


कोपरगाव ता. प्रतिनिधी - माजी आ. अशोक काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षाचे आमदार असतांनाही कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणला. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदीवर पूल व कोपरगाव शहरातील शासकीय इमारती त्या विकासकामांची आजही साक्ष देत आहेत, असे प्रतिपादन कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांनी केले. 

तालुक्यातील रवंदे ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ युवा नेते आशुतोष काळे यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन बाळासाहेब कदम होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते म्हणाले, की युवा नेते आशुतोष काळे व जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी एकत्र येणे ही काळाची गरज होती. तालुक्याच्या जनतेच्या दृष्टीने ही अतिशय आनंदाची गोष्ट असल्याचे सांगितले. हा धागा पकडत जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी कोपरगाव तालुक्याच्या विकासासाठी आपण सदैव युवा नेते आशुतोष काळे यांच्या सोबतच असल्याचे सांगितले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, सुधाकर दंडवते, सोनाली रोहमारे, कारभारी आगवन, पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, सदस्य मधुकर टेके, श्रावण आसने, राहुल रोहमारे , प्रसाद साबळे, रोहिदास होन, प्रशांत वाबळे, राहुल जगधने, सरपंच कविता सोनवणे, उपसरपंच कावेरी कंक्राळे आदींसह ग्रामविकास अधिकारी आहिरे, पोलीस पाटील विलास मोरे, संजय कदम, विश्वनाथ भुसे, सुकदेव घायतडकर, सुरेश कंक्राळे, बापू सोनवणे, संजय काळे, रामदास दवंगे, पोपट धुळे, शंकरशेठ नागरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी उपसभापति अनिल कदम यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन विश्वनाथ भुसे यांनी केले. जयकुमार सोनवणे यांनी आभार मानले.