Breaking News

महिला कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदी शबनम शेख


राहुरी ता. प्रतिनिधी - जिल्ह्याचे भूषण असलेली महानभारतकुमारी किताब विजेती सुवर्णकंन्या एनआयएस कोच शबनम शेख हिची भारतीय महिला कुस्ती संघाची प्रशिक्षकपदी ( कोच ) निवड करण्यात आली. तशकेंत, उजबेकिस्तान येथे दि. १० ते १३ मे दरम्यान होत असलेल्या एशियन चॅम्पीयनशिप स्पर्धेसाठी शेख हिची निवड झाली आहे. लखनऊ येथे दि. २६ मार्चपासून भारतीय संघातील महिला कुस्तीपटूंना प्रशिक्षण देण्यात येत आहे. दि. ९ मेपर्यंत प्रशिक्षण देऊन संघ तशकेंत, उजबेकिस्तानला स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. 

दरम्यान, शबनम शेख हिस आजपर्यंत राज्यभरातून अनेक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. ऑलम्पिकमध्ये खेळून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा तिचा मानस आहे. राहुरी तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष मुखतार सय्यद यांची भाची आहे. या निवडीबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.