Breaking News

अत्रे नाट्यगृहातील भूत प्रकरणी मांत्रिकासह चौघांना अटक

पुणे : पिंपरीतील संत तुकारामनगर भागातील आचार्य अत्रे नाट्यगृहात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी प्रसारमाध्यमांनी बाजू लावून धरल्यानंतर कामगार आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ठेकेदार, मांत्रिक आणि कामगारांना 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. तर एक कामगार अद्याप फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्य अत्रे नाट्यगृहात गेल्या काही दिवसांपासून नूतनीकरणाचे काम सुरू होते. मात्र एका अंधार्‍या कोपर्‍यात काम सुरू असताना, एक महिला ‘इकडे या’ अशी हाक मारत असल्याचा आणि तिच्या बांगड्यांचा आवाज होत असल्याचा भास काही कामगारांना झाला होता.