Breaking News

शेतकरी सुकाणू समितीतर्फे ’अन्नत्याग’ आंदोलन

मुंबई : आम आदमी पक्ष महाराष्ट्रातील शेतकरी सुकाणू समितीचा एक मुख्य घटक आहे. शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीच्या वतीने 19 मार्चला सकाळी 11 ते दुपारी 5 दरम्यान महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नदात्यासाठी ’अन्नत्याग’ आंदोलन करण्याचे ठरवले आहे. 19 मार्च 1986 रोजी चिल गव्हाण (यवतमाळ) येथील शेतकरी साहेबराव करपे, त्यांची पत्नी मालती व 4 मुलं यांनी पवनार जवळील दत्तपुर येथे जाऊन आत्महत्या केली होती. ही शेतकर्‍याची पहिली सामूहिक आत्महत्या मानली जाते. 19 मार्च 2018 रोजी 32 वर्ष होतात. या 32 वर्षात सातत्याने शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. 22 जानेवारी 2018 रोजी विखरण जि.धुळे येथील धर्मा पाटील यांनी तर थेट मुख्यमंञ्यांच्या दालनात जावून आत्महत्त्या केली. आपण या देशाचे नागरिक म्हणून काय करू शकतो? सोमवार दिनांक 19 मार्च रोजी शेतकरी सुकाणू समितीतर्फे संपूर्ण महाराष्ट ्रात ठिकठिकाणी जिल्हाधिकारी कचेरीसमोर अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात आम आदमी पक्षाने राज्यभरातील सर्व जिल्हातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता धनंजय शिंदे 98676 93588 यांना संपर्क साधावा.