देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली : मनमोहन सिंग
नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले आहे. त्यांनी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही, असे म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. ते काँग्रेस महाधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. मनमोहन सिंग म्हणाले, ’पंतप्रधान मोदी यांनी प्रचारादरम्यान जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही. ’पंतप्रधान मोदी यांनी, देशात दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप दोन लाख नोकर्याही दिल्या नाहीत,’ असेही सिंग म्हणाले. सध्या जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती खराब होत आहे. हा सर्व मोदी सरकारच्या अयोग्य प्रशासनाचाच परिणाम आहे. कश्मीरमधील परिस्थिती पाहता आपल्या सीमा सुरक्षित नसल्यासारखे वाटते असेही त्यांनी यावेळी सांगितले.