Breaking News

कृषि विद्यापीठ कर्मचारी क्रिडा स्पर्धा उत्साहात; ‘राहुरी’ला सर्वसाधारण विजेतेपद


खेळामुळे सांघिक भावना निर्माण होऊन कामाची गती वाढते, असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथा यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजित दोन दिवसीय कर्मचारी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे, कुलसचिव डॉ. दिलीप पवार, नियंत्रक विजय कोते, धुळे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक मुसमाडे, प्रशासनाचे उपकुलसचिव विश्वास जाधव, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. शरद पाटील उपस्थित होते. 

कुलगुरु डॉ. विश्वनाथा म्हणाले, विद्यापीठाच्या सोयीसुविधांचा सर्व कर्मचार्यांनी लाभ घेऊन आपले आरोग्य उत्तम ठेवावे. क्रीडा स्पर्धांबरोबरच नियमितपणे योगासने केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांचे भाषण झाले. कुलसचिव डॉ. दिलीप पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. जयप्रकाश गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी कुलसचिव डॉ. दिलीप पवार, डॉ. राजेंद्र पाटील, विभाग प्रमुख डॉ. रावसाहेब भारुड, डॉ. आर. एम. नाईक, विश्वास जाधव, डॉ. अतुल अत्रे आदी उपस्थित होते. अंजली देशपांडे यांनी आभार मानले.