नवीदिल्लीत १७ रोजी कृषी उन्नती मेळावा
भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली येथे आयोजित कृषि उन्नती मेळावा आणि १० व्या राष्ट्रीय कृषि विज्ञान केंद्र परिषदेचे शनिवारी {दि. १७} आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उदघाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी ६८१ कृषि विज्ञान केंद्रांमार्फत जवळपास ८ लाख प्रगतिशील शेतकरी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विद्यापीठ कुलगुरु तसेच भारतीय कृषि संशोधन परिषदेचे संचालक उपस्थितांना संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमाचे दि. १७ रोजी सकाळी दहा वाजता इंटरनेटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. नानासाहेब पवार सभागृहात हे प्रक्षेपण पाहता येणार आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी तसेच विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रगतिशील शेतकरी-कृषि शास्त्रज्ञ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये विद्यापीठ शास्त्रज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.