Breaking News

मध्य मुंबई साबांचा पाच वर्षाचा कारभार संशयाच्या भोवर्‍यात

शासकीय निधीचा अपहार आणि कंत्राटदारांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेल्या पाच वर्षातील कामकाजाची चौकशी व्हावी अशी मागणी जन प्रतिनिधींच्या गोटातून पुढे आली आहे. लेखाशिर्ष 2059 आणि 2216 अंतर्गत कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे उपअभियंता छोरीया यांच्या कार्यकाळापासून काल परवा पर्यंत कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले ए. जे. पाटील आणि स्वप्ना कोळी यांच्या पर्यंतचा सर्व कारभार संशयीत असल्याची चर्चा या मागणीला कारणीभूत ठरली आहे.


सार्वजनिक बांधकाम खात्यातील अपहार साबां प्रशासनाचा शिष्टाचार बनला असावी, अशी शंका येण्याइतपत या विभागात मनमानी कारभार सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात भ्रष्टाचाराची अनेक बीळं असली तरी देखभाल दुरूस्तीसाठी तरतूद असलेल्या 2059 या लेखाशिर्षासह 2216 लेखाशिर्षांतर्गत केल्या जाणार्‍या कामांमध्ये अपहार जिरवणे सहज सोपे असल्याचे अलिकडच्या उघड झालेल्या काही प्रकरणांवरून समोर आले आहे.

मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम खात्यातील गेल्या पाच वर्षातील कार्यकारी अभियंत्यांनी या दोन्ही लेखाशिर्षाखाली केलेल्या कामांमध्ये नियमबाह्य प्रक्रिया राबवल्याने क ोट्यावधीच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचा संशय बळावत आहे.मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत बीडीडी चाळ, वरळी पोलिस कॉलनी, नायगाव पोलिस ठाण्याची इमारत, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय, हाफकीन इन्स्टिट्यूट यासारखे शासकीय निवासस्थाने आणि कार्यालयांचा समावेश आहे. या वास्तूंची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. ही देखभाल दुरूस्ती संधी समजून कार्यरत कार्यकारी अभियंत्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतल्याची चर्चा आहे. ही चर्चा बाळसं धरीत असतानाच ए. जे. पाटील यांचा चोवीस क ोटींचा अपहार आ. चरणभाऊ वाघमारे यांच्या पाठपुराव्यामुळे चव्हाट्यावर आला. त्याची चौकशी होऊन सोमवारी वरळी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे. या चोवीस कोटींच्या प्रकरणामुळे मध्य मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील एकूण कार्यशैली विषयी सुरू असलेली चर्चा या विभागातील कार्यकारी अभियंत्यांचा हेतू संशयाच्या गर्तेत सापडला आहे. या विभागात कार्यकारी अभियंता पदाचा प्रभारी कार्यभार पाहणारे उपअभियंता छोरिया यांच्या कार्यकाळापासून कार्यकारी अभियंता ए. जे. पाटील, स्वप्ना कोळी पर्यंतच्या कामाकाजाची चौकशी अपरिहार्य असल्याची चर्चा लोकप्रतिनिधींमध्ये सुरू असून या संदर्भात सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मध्य मुंबई साबांच्या गेल्या पाच वर्षाच्या कामकाजाची चौकशी करणार असल्याचे समजते.


मध्य मुंबईत रचली जाते कंत्राटदारांची चिताशासकीय निधीचा अपहार करून कोट्यावधी रूपयांची परस्पर विल्हेवाट लावण्यात हातखंडा असलेल्या कार्यकारी अभियंत्यांमुळे मध्य मुंबई साबांची कार्यशैली वादग्रस्त ठरत असताना तीन कंत्राटदारांची आत्महत्या कळीचा मुद्दा बनली आहे. कार्यकारी अभियंत्यांच्या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून दोन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचा प्रक ार विस्मरणात जात नाही तोच युवराज जगदाळे या कंत्राटदारानेही आत्महत्या केली. या आत्महत्येला ए. जे. पाटील आणि स्वप्ना कोळी हे कार्यकारी अभियंता जबाबदार आहेत, असा आरोप असलेली फलकबाजी जगदाळे कुटूंबियांनी केल्याने मध्य मुंबई साबां विभागात कंत्राटदारांची चिता रचली जात असल्याचा उपहास ऐकायला येत आहे.