Breaking News

43 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज ’पद्म’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात 43 व्यक्तींना गौरविण्यात आले. यावेळी संगीतकार इलाई राजा, गुलाम मुस्तफा खान, विचारवंत परमेश्‍वरन यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मंत्रिमंडळातील विविध खात्यांचे मंत्री उपस्थित होते.


प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. कला, शिक्षा, क्रीडा, साहित्य, संशोधन, सामाजिक कार्य इ. क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या 89 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यात महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय आणि राणी बंग, साहित्यिक गंगाधर पानतावणे, अरविंद गुप्ता, ज्येष्ठ अ भिनेते मनोज जोशी यांचा समावेश होता.