Breaking News

भाजपाकडून आधीच तारीख जाहीर

कर्नाटक विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरू असतांनाच, भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरद्वारे निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 12 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होईल असं ट्विट मालवीय यांनी केलं. विशेष म्हणजे मालवीय यांनी ट्विट केले तोपर्यंत निवडणूक आयोगानेही तारीख जाहीर केली नव्हती. सोशल मीडियावर जोरदार टीका व्हायला सुरूवात झाल्यानंतर मालवीय यांनी आपले ट्विट डिलीट केले. यासंदर्भात बोलतांना निवडणूक आरयुक्त म्हणाले की, हा प्रकार गंभीर असून याची चौकशी केली जाईल तसेच कठोर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोगाने घोषणा करण्याआधी निवडणुकांची तारीख फुटलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयोगाने दिला.