महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभावशाली नेते म्हणून प्रबळ दावेदार असलेले माजी उपमुख्यमंत्री, माजी गृहमंत्री, माजी सार्वजनिक बांधकाम पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांंच्यासमोर अनंत अडचणी निर्माण करून ऑर्थर पर्यंत पोहचविण्यात स्वकीयांसह विरोधकांचा जेवढा वाटा आहे तितकाच किंबहुना काकणभर अधिक भुमिका बजावण्यात साबांतील धवड देबडवार नियंत्रित केपी लॉबी अग्रभागी आहे. विद्यमान सरकारने जाणीवपुर्वक भुजबळ प्रकरणाला वेगळा न्याय देण्याच्या भुमिकेतून शरद पवारांसारखा मुत्सद्दी नेता राजकारणाच्या गोंधळात जखडून ठेवला आहे. ही वस्तुस्थिती समोर असतांना काल परवा शरद पवार यांनी केलेले वक्तव्य गोंधळात आणखी भर टाकण्यास कारणीभूत ठरले आहे. भुजबळांचे बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी फडणवीस यांची राहील, असा आशय सुचित करणारे जाणता राजाचे ते वक्तव्य नेमके कुणाकडे अंगुली निर्देश करतात. हा आजच्या राजक ारणातील गुढ प्रश्न आहे.
भुजबळांच्या शुक्ल काष्ठ मागील राहू केतू कोण?
Reviewed by Dainik Lokmanthan
on
23:09
Rating: 5