Breaking News

घोटाळयांची यादीकडे ‘पीएमओ’ कडून दुर्लक्ष माजी गव्हर्नर रघूराम राजन यांचे वक्तव्य

हैदराबाद/वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघूराम राजन यांनी पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर आपले मौन सोडले असून, या घोटाळयाची कल्पना आपण पंतप्रधान क ार्यालयाला (पीएमओ)दिली होती, असे स्पष्टीकरण राजन यांनी दिले. गव्हर्नर असताना आपण सर्व बँकांना स्विफ्ट नेटवर्कसंदर्भात तपास करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नाही, तर पंतप्रधान कार्यालयाला बँक घोटाळ्यांची एक यादीही पाठवली होती. तसेच बँकिंग इन्व्हेस्टिगेटर आणि अंमलबजावणी अधिकार्‍यांकडून यांची संयुक्त चौकशीची करण्याची विनंतीही केली होती, असे रघुराम राजन यांनी म्हटले आहे. 

रघुराम राजन हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांच्याही काळात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. या दोघांपैकी नेमके कोण पंतप्रधान असताना बँक घोटाळ्यांची यादी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला पाठवली, यासंदर्भात राजन यांनी काहीही सांगितले नाही. राजन म्हणाले, स्विफ्ट यंत्रणेत दोष असल्याचे बांगलादेशातील एका बँकेत आढळून आले. जेव्हा अशा प्रकारची समस्या दिसून येते, तेव्हा त्याची माहिती बँकांना देण्याची जबाबदारी नियामकांची असते. आम्हीही असेच केले आणि बँकांना हे दोष दूर करण्यास सांगितले. बँकांनी हे आदेश पाळले नसतील, तर त्यांनी तसे का केले, हे समजून घेणे आवश्य आहे. असेही राजन यांनी म्हटले आहे. ते एका व ृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. 
स्विफ्ट ही एक अशी यंत्रणा आहे, जी जगभरातील बँका व वित्तीय संस्थांमध्ये संपर्क स्थापित करते. तसेच हिच्या सहाय्याने जगातील वित्तीय संस्थांमध्ये ट ्रांझेक्शनसंदर्भातील माहितीचे सुरक्षित, विश्‍वासार्हपणे आदान प्रदान होते. पीएनबी घोटाळ्यातील हमीपत्रे का दिली गेली? त्यांची नोंदणी बँक व्यवस्थेत का केली गेली नाही? बँक व्यवस्थापनास याची माहिती होती का? ही माहिती बोर्डासमोर ठेवली होती का ? असे अनेक प्रश्‍न रघुराम राजन यांनी यावेळी उपस्थित केले.