Breaking News

१० च्या विद्यार्थ्यांसाठी बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन


तालुक्यातील कोर्हाळे येथे असलेल्या श्री गणेश इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने दि. २५ मार्च रोजी १० च्या विद्यार्थ्यांसाठी बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेमध्ये चांगले गुण मिळविणा­या विद्यार्थ्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात येणार आहे. या परिक्षेमध्ये जास्तीतजास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन स्कूलचे संस्थापक प्रा. विजय शेटे यांनी केले आहे. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्यंत अल्पदरात विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी या संस्थेच्या माध्यमातून केली जाते. प्रा. शेटे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कोर्हाळे येथे गेल्या दोन वर्षांपूर्वी श्री गणेश इंटरनॅशनल स्कुलची स्थापना करण्यात आली आहे. येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी, त्यांनी याठिकाणी उच्चशिक्षित शिक्षकांची नेमणूक केली. १५ एकर जागेमध्ये निसर्गमय वातावरणात या स्कूलची निर्मिती करण्यात आली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी हे स्कूल सुरु केले. या स्कूलमध्ये नर्सरी ते १२ वीपर्यंत विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांच्याकडून नीट, सी. ई. टी., आय. आय. टी., के. व्ही. पी. वाय., या प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी आठवीच्या वर्गापासूनच सुरु केली जाते. तसेच कोपरगांव येथे श्री गणेश कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून ११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारचे कोर्सेस सुरु करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने बसची व्यवस्था केली आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मोठे क्रिडांगण आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरुमद्वारे शिक्षण दिले जाते. विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांची तयारी या संस्थेद्वारे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. 

विद्यार्थ्यांचा फायदा हेच ध्येय!
सध्याच्या स्पर्धेच्या व संगणक युगात ग्रामीण भागाच्या विद्यार्थ्यांना आपल्याच परिसरामध्ये चांगल्या प्रकारचे शिक्षण मिळावे, यासाठी अत्यंत अल्पदरात श्रीगणेश इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षा घेण्यात येतात. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परिक्षेची तयारी होण्यासाठी मदत होते. यामुळे १२ वी नंतर विविध क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यासाठी मोठा फायदा होतो. हेच या संस्थेचे ध्येय आहे.