Breaking News

भव्यदिव्य रामजन्मोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन


तालुक्यातील देवळालीप्रवरा शहरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटामाटात {दि. २५} साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा उत्सव भव्यदिव्य होण्यासाठी देवळालीप्रवरा शहरवासियांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्रीराम जन्मोत्सव कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

देवळाली प्रवरा परिसरात नावाजलेला हा उत्सव यावर्षी ही मोठ्या उत्साहात शहरवासीयांच्या सहकार्याने साजरा करण्याचा श्रीराम जन्मोत्सव कमिटीचा मानस आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीही दिनांक २५ मार्च रोजी सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत गंगाजल स्नान, श्रीराम पंचायतनास पंचामृताने अभिषेक तसेच सकाळी १० वाजता समाज प्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे जाहीर हरी कीर्तन आयोजित केले आहे व त्यानंतर दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव व महाआरती झाल्या नंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे असे श्रीराम जन्मोत्सव कमिटी यांनी सांगितले

कार्यक्रमादरम्यान शहरवासियांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळत आहे. तरी यात्रा चांगल्या प्रकारे पार पडावी यासाठी श्रीराम जन्मोत्सव कमिटी प्रयत्नशील आहे. तसेच सर्वांनी या जन्मोत्स्वासाठी उपस्थित राहण्याचे व अधिक सहकार्य करण्याचे आवाहन कमेटीच्यावतीने केले आहे.