शेकडो कंत्राटी कर्मचारी धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर
गडचिरोली, दि. 07, मार्च - कंत्राटी कर्मचारी व अधिकार्यांना शासकीय सेवेत कायम करावे, 9 फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी क र्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कंत्राटी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष वकील खेडकर, सचिव प्रशांत बांबोळे यांच्या नेतृत्वात दुपारी साडेबारा वाजता इंदिरा गांधी चौकातून मोर्चास प्रारंभ झाला. नोकरीत कायम क रा, 9 फेब्रुवारी 2018 चे परिपत्रक रद्द करा अशी विधाने असणार्या टोप्या घालून कंत्राटी कर्मचार्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. या मोर्चात जिल्हा परिषदेंतर्गत क ार्यरत एनआरएचएम, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, शिक्षण विभाग तसेच अन्य अशा 19 विभागातील स्त्री व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य मार्गाने शांततेत मोर्चेकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचले. तेथे मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे नेते रोहिदास राऊत, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, प्राथमिक शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कविश्वर बनपूरकर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कावडकर, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस.वाय.खरवडे यांनी कंत्राटी कर्मचार्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन संबोधित केले.