सोलापूर, दि. 07, मार्च - मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून 44 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना अनिल पगारे (वय 53) यांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. न्यायदंडाधिकारी माहेश्वर पटवारी यांच्या न्यायालयात हजर केल्यानंतर 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. मागील आठवड्यात मुख्य संशयित संदीप शहा यांना अटक झाली होती. युवराज गायकवाड यांच्याकडून 16 लाख तर सिताराम डोंगरे (मोहोळ) यांच्याकडून 28 लाख असे 44 लाख रुपये फसवणूक केल्याची तक्रार विजापूर नाका पोलिसात देण्यात आली होती. ऑक्टोबर 2015 मध्ये शहा याने डोंगरे यांच्या मुलीसाठी व्यवस्थापन कोट्यातून मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळवून देतो म्हणून पैसे घेतले. सीईटी प्रवेश पत्रही बनावट तयार करून फसवणूक केली होती. डोंगरे व गायकवाड या दोन्ही मुलांची फसवणूक केल्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.
मेडिकल प्रवेश प्रकरण; मुंबईतील महिलेला अटक
Reviewed by Dainik Lokmanthan
on
17:30
Rating: 5