आंबडेकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बैठक
पाथर्डी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्याचे नियोजन करण्यासाठी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत या वर्षी कोणत्याही संस्थेतुन, कार्यलयाकडून कुठलीही वर्गणी गोळा न करता समाजबांधवच्या स्वखर्चातून जयंती साजरी करण्याचा निर्णय समविचारी कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला.
यावर्षी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्यातील नामवंत व्याख्यात्यांची महापुरुषच्या जीवनावरील व्याखानाची व्याख्यानमाला आयोजित करण्याचे ठरले तसेच एक गाव एक जयंती हा उपक्रम पाथर्डी शहरासह संपूर्ण तालुक्यात राबवण्याचा विचार सर्वांनी या बैठकीत बोलून दाखवला. तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुजन विचारमंचाची स्थापना करण्यात आली. या बैठकीसाठी प्रा. दिगंबर गाडे, पप्पू बोर्डे, रवींद्र आरोळे, पप्पू शिंदे, सुंदरमामा कांबळे, बाबा राजगुरु, विनोद थोरात, आराख सर, अजय सोनवणे, महेंद्र राजगुरू , संजय साळवे, नाना पगारे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार हुमायुन भाई आतार यांनी मानले.