Breaking News

राष्ट्रीय सेवा योजनेची वंचित मुलांसह रंगपंचमी


येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने खांडगाव येथील स्वयंप्रेरित संस्थेतील वंचित मुलांसमवेत रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी रासेयो अहमदनगर जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले, सारथी फांउडेशनचे अध्यक्ष अक्षय बोंबले, स्वयंप्रेरित संस्थेचे संस्थापक संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रंगपंचमीला आपसातील मतभेद विसरुन एकमेकांना आनंदाने रंग लावला जातो. मात्र समाजाने ज्यांना दूर सारले, जी बालके कुटूंबापासून वंचित आहेत, अशा मुलांसमवेत रंगपंचमीचा सण साजरा कराव आणि या मुलांनाही आनंदीत करावे, या हेतुने महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व सारथी फाऊंडेशन संगमनेरचे सदस्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाचे नियोजन रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. प्रताप फलफले व कार्यक्रम अधिकारी डॉ. सचिन कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रासेयो स्वयंसेवक मंगेश वाघमारे, ऋषिकेश घोडेकर, अमोल खर्डे, ऋषिकेश पावसे, सागर पावसे, वसुधा दातीर, मयुरी आंबरे व प्रगती देशमुख यांनी परिश्रम घेतले.