शुध्दलेखनाचे नियम कधीही शिकता येतात : डॉ. मालपाणी
मराठी भाषा एक समृध्द भाषा आहे. ब-याचदा मराठी लिहितांना व बोलतांना कळत नकळत चुका होतात. परंतु शुध्द मराठी बोलणे व लिहिणे हे थोडयाशा प्रयत्नाने सहज साध्य होऊ शकते. मराठीचे नियम शिकतांना कोणत्याही वयाची अट नसते. महिनाभर प्रयत्न केले, तर हस्ताक्षर सहज सुधारु शकते. थोडक्यात सांगायचे तर शुध्दलेखनाचे नियम कधीही शिकता येतात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले.
शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात कला, शाखा विद्यार्थी विकास मंच अंतर्गत आयोजित 'सुंदर हस्ताक्षर व शुध्दलेखन ' या विषयावर डॉ. मालपाणी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. उपप्राचार्य मेधा शिरोडे, पर्यवेक्षक डॉ. शांताराम रायसिंग, कलाशाखा विद्यार्थी मंचचे कार्याध्यक्ष प्रा. सुशांत सातपुते आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सारिका शिंदे यांनी केले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. सुशांत सातपुते यांनी आभार मानले.