गोंधवनी येथे श्रीरामजन्मोत्सवानिमित्त भव्य मिरवणूक
श्रीरामपूर ,शहरातील गोंधवनी रोड मित्र मंडळाच्या वतीने श्रीरामनवमी निमित्त भव्य दिव्य झेंडा मिरवणूक काढून श्रीराम मंदिरावर झेंडा लावण्यात आला. यावेळी श्रीरामाच्या जयघोष करण्यात आला. या भव्य दिव्य मिरवणुकीचे ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते स्वागत करून झेंड्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
गोंधवणी येथील महादेव मंदिरापासून मिरवणुकीस सुरवात झाली. शेकडो श्रीरामभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते. प्रभू श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मिरवणुकीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांनी स्वागत करून झेंड्याला पुष्पहार घातला. डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनीही झेंडा मिरवणुकीचे स्वागत करून पुष्पहार अर्पण केला. गांधी चौकात युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे , शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन बडदे यांनी मिरवणुकीचे स्वागत करून झेंड्याला हार घातला. ठिकठिकाणी मान्यवरांनी झेंडा मिरवणुकीचे स्वागत केले.
यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान पहाटे पो. नि. संपतराव शिंदे यांनी श्रीराम मंदीरात श्रीरामाची विधीवत पूजा केली. दुपारी श्रीराम मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होत्या. श्रीरामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. दुपारी 12 वाजता मान्यवरांच्या हस्ते श्रीरामाचा पाळणा हलवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार भाऊसाहेब कांबळे , नगराध्यक्षा अनुराधा आदिक , नगरसेवक दीपक चव्हाण , भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते , सेनेचे सचिन बडदे , नगरसेविका वैशाली चव्हाण , नगरसेवक राजेंद्र पवार , संजय यादव , सतीश सौदागर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.